पुरंदर पंचायत समिती बांधकाम विभागाचा प्रताप ; खरच होते का आर्थिक देवाण-घेवाण? काम अर्धवट अन बिल काढले सरसकट.

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील पशुवैद्यकीय उपकेंद्रातील डॉक्टर निवास इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही.अनेक कामे अर्धवट असून देखील संपूर्ण इमारतीच्या कामाचे बिल काढण्याचा प्रताप पुरंदर बांधकाम उपविभागाने केला असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.अधिक माहितीनुसार नायगाव तालुका पुरंदर येथील पशुवैद्यकीय डॉक्टर निवास इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार अर्धवट आहे.

यामध्ये वॉटर प्रूफिंग, शौचालय दरवाजा, शौचालय सांडपाणी व्यवस्था, पाणी वापरासाठीची पाण्याची टाकी, किचन वॉश बेसिन, बाथरूम,शौचालया मधील पाणी नळ फिटिंग, कामाचा फलक इत्यादी कामे प्रत्यक्ष दर्शन अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.बांधकाम विभागाचे तत्कालीन शाखा अभियंता बी,के पवार यांनी ठेकेदाराकडून आर्थिक देवाण-घेवाण करून अर्धवट कामाचे संपूर्ण बिल काढल्याचा आरोप स्वप्निल पाटोळे व संतोष गायकवाड यांनी केला आहे.

नायगाव येथील पशुवैद्यकीय डॉक्टर निवास इमारतीच्या बांधकामात झालेला भ्रष्टाचार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका युवक उपाध्यक्ष स्वप्निल पाटोळे व माहिती अधिकार संतोष गायकवाड यांनी माहिती अधिकारातून कार्यकारी अभियंता,बांधकाम विभाग दक्षिण व जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आणून दिला.त्यानंतर कार्यकारी अभियंता देसाई यांनी शाखा अभियंता लोखंडे यांना संबंधित कामाची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते.

तदनंतर लोखंडे यांनी प्रत्यक्ष कामावर जावून पाहणी केली असता डॉक्टर निवासी इमारतीचे बांधकाम अर्धवट स्थितीत असल्याचे त्यांच्या पाहण्यात आले. तरीदेखील बी,के पवार यांच्या दबावामुळे शाखा अभियंता लोखंडे हे अहवाल देण्यास टाळाटाळ करीत आहेत.यामुळे तक्रारदारांना न्याय मिळत नाही. विशेष म्हणजे भ्रष्टाचार झालेल्या कालावधीतच बिके पवार यांचे शाखा अभियंता या पदावरून उप अभियंता या पदावर प्रमोशन झाले.

यामुळे पुरंदर पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा भ्रष्ट कारभार उघडकीस आला आहे.अधिकारीच अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचाही धाक राहिलेला नाही असेच दिसून येत आहे.आर्थिक देवाण-घेवाणीतुन मात्र शासनाची लूट होत आहे. यामुळे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात पुरंदर हवेली येथील कामाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर उचीत कारवाई करावी.

तसेच नायगाव येथील पशुवैद्यकीय उपकेंद्रातील डॉक्टर निवासी इमारतीचे बांधकाम पूर्ण करावे अन्यथा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पुरंदर पंचायत समिती समोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे युवक उपाध्यक्ष स्वप्निल पाटोळे व संतोष गायकवाड यांनी दिला आहे.

सदर इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झालेले आहे.कुठलीही तफावत नाही.केवळ सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असलेले पाईप जोडणीचे काम राहिले आहे.डॉक्टर राहायला नसल्याने ती अडचण आहे.तीही लवकर सोडविली जाईल. बि,के,पवार. उपअभियंता बांधकाम विभाग उपविभाग पुरंदर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *