पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे गावात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. चालता बोलता गावातील सर्वांना आवडणारा,सर्वात मिसळणारा असा दादू उर्फ विकास तुकाराम शेंडगे याचं हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने अकस्मित असं निधन झाले.
सर्वात मिसळणारा असल्यामुळे सर्वच मित्रांना व गावातील सर्व सहकाऱ्यांना त्याच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला आहे.अवघ्या वयाच्या 47 वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.
एक बहुआयामी व्यक्तिमत्व,समाजाप्रती असणारे प्रेम व दिलेला शब्द पाळणारा अशा प्रकारची त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा व एक मुलगी आणि वडील तसेच एक विवाहित बहीण असा परिवार आहे.
त्यांच्या जाण्याने आंबळे तसेच आंबळे पंचक्रोशीतील तरुणांना खूप मोठा धक्का बसला असून सर्वच तरुणांचा एक आधार हरवला अशी भावना सध्या तरुणातून व्यक्त होत आहे.