पुरंदर तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या “या” संचालकांचे संचालक पद धोक्यात!!!!!

पुरंदर तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या “या” संचालकांचे संचालक पद धोक्यात!!!!!

पुणे

सोमेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक बाळासाहेब कामठे हे संचालक पदावर निवडून येताना एका बँकेचे थकबाकीदार होते. त्यामुळे ते कारखान्याच्या संचालक पदी राहण्यास अपात्र ठरत असून त्यांचे पद रद्द करणे आवश्यक आहे. असे मत प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने नोंदवले आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये बाळासाहेब कामठे हे मोठ्या मताधिक्याने सोमेश्वर कारखान्याच्या संचालक पदावर निवडून आले होते. डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई. यांच्या सासवड शाखेकडून कामठे यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाची भरपाई न केल्याने डेक्कन बँकेने ताबा नोटीस 13 जून 2022 रोजी बजावली होती. 15 जुलै रोजी वृत्तपत्रात ताबा नोटीस प्रसिद्ध ही झाली होती. त्यानुसार मारुती लक्ष्मण कामठे यांनी 12 सप्टेंबरला प्रादेशिक सहसंचालकांकडे तक्रारी अर्ज करत बाळासाहेब कामठे यांना अपात्र करावं अशी मागणी केली होती.

पुणे विभागाचे प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे यांनी डेक्कन बँकेची संपर्क साधून कामठे यांच्या कर्जाचा अहवाल मागितला. त्या अहवालामध्ये बँकेने सप्टेंबर 2018 अखेर व्याजासह दोन कोटी 95 लाख रुपये थकीत असल्याचे कळवले. त्यामुळे कामठे हे थकीत कर्जदार ठरतात असा निष्कर्ष गोंदे यांनी काढला.

त्यामुळे सहकार कायदा 1961 च्या कलम 58 मधील वैधानिक तरतुदीनुसार ते सोमेश्वर कारखाना संचालक पदी राहण्यास अपात्र ठरत आहेत. तर सहकार कायदा 1960 चे कलम 73 अनुसार त्यांचे पद रद्द करणे आवश्यक झाले आहे.असा स्पष्ट निष्कर्ष प्रादेशिक सहसंचालकांनी काढला आहे.

त्यानुसार “पद का रद्द करण्यात येऊ नये” याबाबत बाळासाहेब कामठे यांना नुकतीच बजावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *