पुरंदर तालुक्यातील “या” रस्त्याच्या श्रेयासाठी तीन पक्षात सुरु आहे लढाई ? पण हा रस्ता होणार तरी कधी ??????

पुरंदर तालुक्यातील “या” रस्त्याच्या श्रेयासाठी तीन पक्षात सुरु आहे लढाई ? पण हा रस्ता होणार तरी कधी ??????

पुरंदर

सासवड शहरातील महादेवाचे सुप्रसिद्ध मंदिर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा सासवड शहर ते सिद्धेश्वर मंदिर रस्ता या रस्त्याचा उल्लेख  गुरुकुल हौऊसिंग सोसायटी ते सिद्धेश्वर मंदिर रस्ता असे देखील केला जातो  हा रस्ता  सध्या तीन ते चार दिवसांपासून  मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे. या रस्त्याबाबत मोठ्या प्रमाणावरती चर्चा रंगलेली  असून  सोशल मीडियावर तर  राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच राडा  रंगलेला आहे.  यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि  शिवसेना (शिंदेगट) या तिघांमध्ये तुफान जुगलबंदी सध्या सासवडकर नागरिकांना  पाहायला मिळत आहे .

सासवड शहर ते सिद्धेश्वर मंदिर रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावरील खड्डे व अरुंद रस्ता याबाबत सुरुवातीला शिंदे समर्थक शिवसेना गटाने आंदोलनाचा पवित्रा घेतला लगेच त्याला विरोध म्हणून व ते  आंदोलन खोडून काढण्यासाठी म्हणून सासवड नगरपरिषदेतील काँग्रेस प्रणित जनमत विकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी नगरसेवक धावून आले. यानंतर या दोघांमध्ये वाद रंगलेला असतानाच भरीतभर म्हणजे  यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ही उडी घेतली आता या तिघांमध्ये वादाचा विषय हा होता की हा रस्ता रखडला का ?आणि या रस्त्यावरती निधी नेमकं आणणार तरी कोण ?अशा पद्धतीची चर्चा रंगलेली होती.

सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि  काँग्रेस म्हणत आहे की  नगरपालिकेने १  कोटी २०  लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी अगोदरच मंजूर केलेला आहे.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे रस्त्याचं काम रखडलेलं होतं आणि लवकरच ते चालू होणार आहे . 

शिंदे समर्थक शिवसेना गटाचे म्हणणे आहे की,पाच वर्ष सत्तेत असणाऱ्या सासवड नगरपरीषदेतील  सत्ताधाऱ्यांनी हा रस्ता का केला नाही? त्यांनी या रस्त्याचे काम केलेलं नाही म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या रस्त्याच्या निधीची मागणी करणार आहे . 
 
आता ह्या दोघांमध्ये वाद चालू असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यामध्ये उडी घेत म्हटलं की आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे या रस्त्याच्या निधीसाठी अगोदरच  मागणी केली होती आणि त्यांनी जिल्हाधिकारी यांना तसे पत्र दिले आहे . 

यानंतर त्यांनी केलेले पत्रव्यवहार हे देखील सोशल मीडियावरती व्हायरल करण्यास सुरुवात केली एकंदरीतच ही सर्व चर्चा रंगलेली असताना पत्रकारपरिषद घेत सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनीही प्रतिक्रिया दिल्या आणि दुसर्‍या बाजूने शिंदे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद घेतली. 
एकंदरीत आता कोंगेस आणि शिंदे गट शिवसेना यांच्याकडून पत्रकार  परिषदांचा तडाखा  दोन्ही बाजूनी चाललेला आहे आणि यातून राजकीय वातावरण मात्र सासवड शहरात तापू लागलेले  आहे. 
 
आपण जर बघितलं तर  या राजकीय आखाड्यामध्ये आणि कलगीतुर्‍या मध्ये ज्या सासवड शहर ते सिद्धेश्वर रस्त्यावरून हा वाद पेटला आहे तो  रस्ता नेमका होणार तरी कधी असा प्रश्न आता सर्वसामान्य सासवडकर नागरिकांना आणि  या रस्त्याने रोज ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या शंभू भक्तांना पडलेला आहे.  याबाबत आता  सासवडकर नागरिक हे म्हणतोय की राजकारण तुमचं नक्की करा पण कोणीही करा तो रस्ता आता  लवकरात लवकर नीट  करा …..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *