पुरंदर तालुक्यातील “या” मोठ्या हॉटेलमधील लग्नसामारंभात तीन लाख साठ हजाराचे दागिन्यांची चोरी

पुरंदर तालुक्यातील “या” मोठ्या हॉटेलमधील लग्नसामारंभात तीन लाख साठ हजाराचे दागिन्यांची चोरी

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील दिवे येथील जाधवगड या हॉटेल मध्ये लग्न समारंभात तब्बल ३ लाख ६० हजाराचे दागिने केले लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली असून नवरीच्या आलका सुरेश खाडे वय 45 वर्षे, व्यवसाय – घरकाम, रा. बसीलो सोसायटी भाऊराव पाटील रोड शिवराम नगर पिंपळे गुरव फलॅट नंबर 704, आपोजीट नर्मदा गार्डन पिंपळे गुरव पुणे यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आली आहे . 

यासंदर्भात सासवड पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार पुरंदर तालुक्यातील दिवे येथील जाधवगड  या हॉटेल मध्ये  दि 17/4/2022 रोजी 6.05 वा लग्नाकार्य पार पडले नंतर महाराणी सुट रूममध्ये फिर्यादी  व त्यांची  मुलगी आवरा आवरी करत असताना त्यांनी  दागीन्याचा बॉक्स पाहीला. त्यात कानातील एक झुमका नव्हता त्यांनी  रूम मध्ये इकडे तिकडे शोध घेतला परंतु झुमका मिळुन आला नाही तेव्हा फिर्यादी यांनी बहिणीला सांगीतले, आम्ही सगळीकडे शोध घेतला परंतु झुमका मिळुन आला नाही.

मी माझे पती सुरेश महादेव खाडे यांना त्या बाबत सांगीतले परतु बॅगेत वगैरे असेल म्हणुन त्यांनी दुर्लक्ष केले , त्यानंतर ते सगळे  घरी निघुन गेले  घरी गेल्यावर फिर्यादी व त्यांचे  पती सुरेश यांनी सर्व बॅगा चेक केल्या,तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,फिर्यादी यांच्या बॅगेतील 1,35,000 रू  किमतीची तीने तोळे वजनाची सोन्याची मोहन माळ ,40,000 रू .किमतीचे  एक तोळा वजनाचे कानातील एक झुमके ,75,000/ रोख रक्कम त्यात  500 रू दराच्या 150 नोटा,  1,10,000/रू 1  टायटन कंपनीचे कपंनीचे 10,000 रू किंमतीचे घडयाळ, 1 डी डब्लु कंपनीचे 25,000 रू किमतीचे घडयाळ , 1 रॅडो कंपनीचे 75,000 रू किंमतीचे घडयाळ असा एकूण तब्बल 3,60,000/-रू किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.  

सदरची चोरी ही  लग्नात मुलीचा मेकअप करायला बोलावलेल्या मुली 1) प्रिया रा मुंबई 2) लक्ष्मी पुर्ण नाव महीत नाही रा नाशीक, , 3) श्रध्दा पुर्ण नाव माहीत नाही रा पुणे मो न  यांनी केली असल्या बाबत फिर्यादी यांचा संशय आहे. सासवड पोलिसांनी भा.द.वि. कलम 379,34 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *