पुरंदर तालुक्यातील “या” मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे लाखो रुपयांचे दागिने,रोखं रक्कमेची चोरी !!!!!

पुरंदर तालुक्यातील “या” मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे लाखो रुपयांचे दागिने,रोखं रक्कमेची चोरी !!!!!

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील केतकावळे येथील  बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या लाखो रुपयांचे   दागिने व रोखं रक्कमेची चोरी झाल्याची घटना घडली असून  ऋतूराज प्रकाश जाधव वय 30 वर्षे  रा.कर्नवडी ता.खंडाळा जि.सातारा यांनी सासवड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे . 

याबाबतीत सासवड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार  दि . ३ जुलै २०२२  रोजी सकाळी ९ .४५  वा. ते १० .१५  वा.चे दरम्यान . केतकावळे ता.पुरंदर जि.पुणे येथील बालाजी मंदीराचे पार्कीग मध्ये फिर्यादी यांनी त्यांची  मारुती कार नंबर एम.एच.14/एच/9946 मध्ये गळयात अडकविणेचे पर्समध्ये ठेवले होते.

कोणीतरी अज्ञात चोरटयाने कारचा पाठीमागील दरवाजा उघडून पर्समधून  32,000/-  रोख रक्कम त्यामध्ये 500, 200 दराच्या नोटा, 1,85,000/- लहान मुलीचे गळयातील सोन्याची चैन 8 ग्रॅम, सोन्याचे पान 2 ग्रॅम, हातातील व पायातील तोडे सोन्याचे प्रत्येकी 5 ग्रॅम दोन्ही मिळून 10 ग्रॅम, कानातील डुल 3 ग्रॅमवजनाचे , 10 ग्रॅम वजनाचे गळयातील मनी मंगळसुत्र त्यामध्येकाळे मणी, लहान लेडीज अंगठी 5 ग्रॅम असे एकूण  38  ग्रॅम चे सोन्याचे दागीने असा एकूण 2,17,000/- रुपयांचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेले आहेत म्हणून अज्ञात चोरटयाविरुध्द तक्रार आहे. सासवड पोलिसांनी  भा.दं.वि.कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *