पुरंदर तालुक्यातील “या” चेअरमनचा नादच करायचा नाही; वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मंदिरासाठी दिली तब्बल एक लाख अकरा हजाराची देणगी

पुरंदर तालुक्यातील “या” चेअरमनचा नादच करायचा नाही; वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मंदिरासाठी दिली तब्बल एक लाख अकरा हजाराची देणगी

पुरंदर

महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय कृषिभुषण पुरस्कार विजेते,शेंडकर पिंपरी विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटी लि.शेंडकर पिंपरी सोसायटी चे चेअरमन पिंपरी (ता.पुरंदर)चे सुपुत्र महादेव शेंडकर यांचा वाढदिवस नुकताच दोन जुलै रोजी संपन्न झाला.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशन करण्यासाठी ईतरत्र मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो परंतु त्यांच्या पत्नी मा.सरपंच सौ.मिनाताई शेंडकर व रिजर्व बॕक हेड आॕफिस मुंबई येथे कार्यरत असणारे त्यांचे चिरंजीव प्रितम शेंडकर या कुंटुंबीयांनी पिंपरी येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरासाठी एक लाख आकरा हजार पाचशे एक्कावन्न रू.धनादेश देणगी म्हणुन देऊन नवीन तरूण पिढी समोर एक अगळा वेगळा आदर्श निर्माण केला.

ज्या समाजामुळे आपल्याला संस्कार मिळाले ओळख मिळाली त्या सामाजिक बांधिलकीची जाण ठेवुन आपण व आपल्या कुंटुंबीयांने हा निर्णय घेतल्याचे महादेव शेंडकर यांनी यावेळी सांगितले.


पिंपरी ग्रामस्थांच्यावतीने विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती प्रतिनिधी मा.सरपंच दिलीप शेंडकर यांनी हा धनादेश स्विकारला.


यावेळी पुरंदर हावेलीचे मा.आमदार अशोकभाऊ टेकवडे ,युवा नेते अजिंक्यभैया टेकवडे, धालेवाडीचे मा.चेअरमन हनुमंत काळाने, युवक काॕग्रेस चे मा.तातुका अध्यक्ष गणेश मेमाणे,संजय माने,राजेश कोलते, पिंपरी सोसायटी चे मा.चेअरमन विद्यमान संचालक विजय थेऊरकर व्हाय चेअरमन प्रविण मारणे,सोसायटी संचालक सुखदेव हंबीर,बाबुराव शेंडकर संतोष गायकवाड,संपतदादा शेंडकर,शंकर ल.शेंडकर ,विठ्ठल शेंडकर,अशोक सोनवणे,शंकर शेंडकर,सौ.शितल चव्हाण सौ.शोभा हंबीर’पोलिस पाटील पुनम शेंडकर, रोहिदास हंबीर,दिलीप हंबीर, दत्तात्रय हंबीर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *