पुरंदर तालुक्यातील “या” गावातून १७ वर्षीय मुलास फुस लावून नेले पळवून

पुरंदर तालुक्यातील “या” गावातून १७ वर्षीय मुलास फुस लावून नेले पळवून

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील माढा कॉलनी सोपान नगर येथून काल रात्री एक 17 वर्षीचा मुलगा बेपत्ता झाला आहे. अरबाज अकबर आतार असे या मुलाचे नाव आहे. रंग गोरा तसेच सडपातळ बांधा,उंची पाच फूट सहा इंच, त्याच्या अंगात पिंक व्हाईट कलरचा हाफ टी-शर्ट,निळ्या कलरची जीन्स पॅन्ट, डोळ्यास चष्मा, पायात पांढरा रंगाचा बूट असे या मुलाचे वर्णन आहे.

सदर मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. सदर मुलगा कोठे आढळल्यास सासवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *