पुरंदर तालुक्यातील “या” गावात होणार एटीएम?? ग्रामस्थांनी केली पिडिसीसी बँकेच्या एटीएमची मागणी

पुरंदर तालुक्यातील “या” गावात होणार एटीएम?? ग्रामस्थांनी केली पिडिसीसी बँकेच्या एटीएमची मागणी

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र सिध्देश्वर नायगाव येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत एटीएम सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.शाखा व्यवस्थापकाना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,नायगाव येथील जिल्हा बँकेत नायगाव परिसरातील नऊ गावातील खातेदार व दहा सोसायट्या संलग्न आहेत.

त्याच प्रमाणे नायगाव येथील श्री सिध्देश्वर देवस्थानला क तीर्थ क्षेत्राचा दर्जा असल्याने परिसरातील भाविकांची याठिकाणी रोजच वर्दळ असते.महत्वाचे म्हणजे जवळच्या गावांमध्ये कोणत्याही बँकेचे एटीएम नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते.

या सर्व बाबींचा विचार करता आपल्या शाखेमध्ये ए.टी.एम मशीन सुरू करण्यात यावे.याबाबतचे निवेदन महेश कड,गणेश चौंडकर,स्वप्नील पाटोळे,संतोष गायकवाड,रमेश कड आदींनी शाखा व्यवस्थापक रवींद्र मचाले यांच्याकडे लेखी स्वरूपात दिले आहे. यावेळी पिंपरी सोसायटीचे प्रकाश मारणे,अजित मेमाणे,मंगेश चौंडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून शाखा व्यवस्थापक मचाले साहेबांनी झोनल कार्यालयाकडे मागणी पत्र पाठवून एटीएम मशीन मिळण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *