पुरंदर
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
पुरंदर तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे. पुरंदर तालुक्यातील रानमळा येथे राहणाऱ्या राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित महिलेच्या थेट घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली.
याप्रकरणी पीडित महिलेने जेजुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अतुल नामदेव कुदळे रा.समर्थ नगर, हिंगणे आळी, वडगाव धायरी, पुणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दिनांक ६ मार्च २०२२ ला रात्री ८.३० वाजता फिर्यादी महिला घरी असताना अतुल कुदळे फिर्यादी यांच्या घरी आला.
फिर्यादीच्या घरात प्रवेश करून फिर्यादीच्या पाठीमागून येऊन माझी पत्नी गेली आहे आता तू आहेस कि असे म्हणून पाठीमागून मिठी मारून अंगावर ओढून कमरेचे खाली हाताने चिमटे घेऊन मनास लज्जा उत्त्पन्न होईल असे कृत्य केल्याचे पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जेजुरी पोलिसांचा अधिकचा तपास चालू आहे.