पुरंदर तालुक्यातील “या” गावात अंजीर शेती ठरली फलदायी;वर्षाला होते लाखो रुपयाची कमाई

पुरंदर तालुक्यातील “या” गावात अंजीर शेती ठरली फलदायी;वर्षाला होते लाखो रुपयाची कमाई

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील दिवे गावचे रहिवासी सुनील सुभाष झेंडे यांनी 200  अंजीर झाडातून लाखो रुपये उत्पन्नाचा असा अजब कारनामा केला आहे फक्त दोन एकर शेतीत अंजिराच्या केलेल्या 200 झाडांच्या संगोपनातून सुनील झेंडे यांना वार्षिक खर्च वजा नऊ ते दहा लाखांचा निव्वळ नफा होत असल्याचे संजीवनी न्यूज शी बोलताना सांगितले.


सध्या पुरंदर तालुका हा शासन दरबारी दुष्काळी म्हणून घोषित झाला आहे. त्या धर्तीवर पुरंदर तालुक्यात पाण्याचे खूप मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष आहे. तर सुनील झेंडे यांनी कमी पाण्यात योग्य नियोजन करून आपली अंजीर बागही पोटच्या पोरासारखी सांभाळलेली आहे.


आजकाल शेतकरी बऱ्याच ठिकाणी पाटपाण्याद्वारे फळशेतीला पाणी देताना दिसतात. पण सुनील झेंडे यांच्या अंजिराच्या बागेत कुठेही पाट दिसणार नाहीत. प्रत्येक झाडाला पाणी देण्यासाठी ते पाईप चा वापर करतात शेतात कुठेही पाणी वाया जाऊ न देता ते झाडांना आळे करून थेट झाडांच्या आळ्यातच पाईपच्या माध्यमातून पाणी सोडतात. तब्बल दोनशे झाडांना पाणी देताना खूप कष्ट  घेत त्यांनी ही फळशेती खूप चांगल्या प्रकारची केली आहे.


तर आठ ते दहा दिवसांनी वातावरण बदलानुसार औषध फवारणी व पाण्याचे उत्कृष्ट नियोजन केले तर अंजीर शेती हा खूप चांगला पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले सुनील झेंडे हे अंजिराचा सर्व माल मुंबई येथे पाठवतात व त्यांना खूप चांगल्या प्रकारे  बाजारभाव मिळत आहे.

या शेतीत मला जेवढे कष्ट करावे लागतात त्याच पटीने माझी पत्नी पुनम झेंडे हिचा खूप मोठा वाटा आहे तिच्या सहकार्यामुळेच मी ही शेती खूप चांगल्या प्रकारे करू शकतो
सुनील झेंडे अंजीर उत्पादक शेतकरी दिवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *