पुरंदर तालुक्यातील “या” गावचे सरपंच यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

पुरंदर तालुक्यातील “या” गावचे सरपंच यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

पुरंदर (प्रतिनिधी) निलेश भुजबळ

पिंगोरी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून येथील सरपंचपद जवळपास एक ते दीड वर्षे रिक्त होते. तर, ओबीसी आरक्षणाशिवाय सरपंचपद भरण्यात यावे, असे जिल्हा प्रशानासनाने आदेशानंतर खुल्या गटामधून जीवन  शिंदे हे वर्ष- दीड वर्षानंतर पिंगोरीचे सरपंच म्हणून विराजमान झाले.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात न्यायालयीन दाव्यासंदर्भातील माहिती लपविल्याप्रकरणी गुन्ह्य़ाची नोंद केली आहे.पिंगोरी गावचे सरपंच जीवन नंदकुमार शिंदे यांच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

“माझ्या विरूध्द माझ्या पत्नीने  पोटगीसाठीचा दावा  निवडनुक झाल्यावर केला आहे.निवडणुकीच्या शपथ पत्रात या दाव्याचा उल्लेख कसा करणार? कारण तो दावा शपथ पत्र सादर केल्यानंतर करण्यात आला आहे. प्रशासनाने घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे”. : जीवन शिंदे,सरपंच,पिंगोरी ग्रामपंचायत

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिंगोरी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २१ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न होऊनही सरपंच पदासाठी आरक्षणाचा तिढा मात्र कित्येक दिवस कायम होता. परंतु, न्यायालयीन आदेश प्राप्त झाल्यावर सरपंचपदासाठी सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडल्याने जीवन शिंदे यांची ग्रामपंचायत सदस्यातून सरपंचपदी निवड झाली होती. मात्र, निवडणूक लढविताना त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेला त्यांच्या पत्नीचा पोटगी संदर्भातील दावा व त्याची माहिती लपविल्याचे आढळून आले.

त्यामुळे पिंगोरीचे माजी उपसरपंच धनंजय शिंदे यांनी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊनच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पुरंदरचे नायब तहसीलदार दत्तात्रेय गवारी यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात पिंगोरीचे नवनिर्वाचित सरपंच जीवन शिंदे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *