पुरंदर तालुक्यातील “या” आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी बेपत्ता; पत्नीनेच दाखल केली तक्रार

पुरंदर तालुक्यातील “या” आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी बेपत्ता; पत्नीनेच दाखल केली तक्रार

पुरंदर

आरोग्य केंद्र बेलसर(ता.पुरंदर) येथील आरोग्य अधिकारी सागर तुळसीराम डांगे (वय 36 वर्ष) मंगळवार (दि.25) पासुन बेपत्ता असल्याची खबर त्यांची पत्नी शुभांगी डांगे यांनी जेजुरी पोलिस स्टेशन येथे दिली आहे.सागर डांगे हे मूळचे वडाळी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील असुन मागील काही वर्षांपासुन प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर मध्ये आरोग्य अधिकारी म्हणून काम करत आहेत.

सागर डांगे हे मंगळवार (दि.25) रोजी सकाळी 8.30 वाजता बेलसर येथील सरकारी रुग्णालयातुन मिसिंग आहेत.सागर डांगे हे सध्या सासवड (ता.पुरंदर) येथे वास्तव्यास होते.रंग गोरा,उंची 5.5 फुट,केस काळे,उभट चेहरा,मिशा राखतात,पायात काळ्या रंगाची चप्पल,उजव्या हातावर डॉक्टर साईन चे टँटो गोंदलेले आहे.अंगावर जीन्स पँन्ट व मेहंदी रंगाचा शर्ट त्यांना मराठी हिंदी इंग्रजी भाषा बोलता येतात. अश्या वर्णनाचा व्यक्ती पाहंण्यात आल्यास जेजुरी पोलिस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

सागर डांगे हे बेलसर येथील सरकारी रुग्णालयातील शिपाई प्रभाकर संपत जगताप यांच्या कडे चिट्ठी देवून निघुन गेले आहेत.अशी माहीती त्यांच्या पत्नी डॉ. शुभांगी डांगे यांनी पिलिसांत दिली आहे.सदर वर्णनाचा इसम आढळून आल्यास जेजुरी पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक उमेश तावसकर व पोलिस हवालदार टी.व्ही. खाडे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *