पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना!  बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलजोडी पडली विहीरीत;एकवीस लाख रुपयांचा बैल जागीच ठार

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना! बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलजोडी पडली विहीरीत;एकवीस लाख रुपयांचा बैल जागीच ठार

पुरंदर

तालुक्यातील शिवरी येथे काल (गुरुवारी) बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. शर्यत सुरू झाल्यानंतर बैलगाडीवरील नियंत्रण सुटलं. यामुळे मोठी दुर्घटना घडली.

बैलगाडी धावपट्टी सोडून धावत होती. सुसाट वेगात धावणारी ही बैलजोडी थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना इतकी भयानक होती, की यात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या बैलाची किंमत 21 लाख रूपये होती.तर दुसऱ्या बैलाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं आहे.

नियंत्रण सुटलेल्या बैलगाडीला थांबवण्यासाठी गेलेल्या संदीप कामथे यांच्या अंगावरून बैलगाडी गेली. त्यामुळे या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जेजुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *