पुरंदर तालुक्यात “या” ठिकाणी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

पुरंदर तालुक्यात “या” ठिकाणी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

पुरंदर

जेजुरी शहरातील शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या होळकर तलावात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

दिनांक १५ मार्च २०२२ रोजी मौजे जेजुरी गावच्या हद्दीत होळकर तलावात एक अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे ४० ते ४५ वर्षे वय असून नाव व पत्ता समजुन येत नाही. सदर मृतदेह हा नग्नावस्थेत  पाण्यावर तरंगत असताना मिळून आला आहे. डोक्यावर काळे वाढलेले केस अर्धवट टक्कल, चेहरा गोल ,डोळे बंद, तोंड फुगलेले ,उघडे जीभ बाहेर आलेली आहे.

सदरचे मयता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. मयताचा पुढील तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नांदे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *