पुरंदर
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व पुरंदर – हवेली चे लोकप्रतिनिधी आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत वचन परिपूर्ण विकासाचे नेतृत्व आपल्या हक्काचे या मथळ्याखाली तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्याबाबत पत्रक व फ्लेक्सच्या माध्यमातून जाहिरात करण्यात आली.
त्यानुसार विविध गावांत वेगवेगळ्या वेळी सदर कामाचे भूमिपूजन करण्याबाबत वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या त्यानुसार काही ठिकाणी कामाचे भूमिपूजन ही करण्यात आले.
मात्र यातील काही गावांतील कामे माजीमंत्री विजय शिवतारे यांनी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मंजूर करुन घेतली आहेत, याबाबतचे पुरावे नागरीकांना वाटप करुन शिवसैनिकांनी जिल्हा परिषद सदस्य ज्योती झेंडे व तालुका शिवसेना प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांच्या हस्ते, शिवसैनिकांच्या उपस्थितीत वाघापूर चौफुला ते गुरोळी या रस्त्याचे भूमिपूजन करुन घेतले.
खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांनी सदर कामाचे भूमिपूजन करण्याधी सदर कामाचे भूमिपूजन करुन घेतले व आमदार संजय जगताप यांना तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे,असे असताना पुरंदर तालुक्यात मात्र काॅंग्रेस व शिवसेनेमध्ये श्रेय वादासाठी कडवा संघर्ष सुरू असून,एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्हीही पक्षाकडून केला जात आहे.
खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणाऱ्या कामापैकी काही कामे ही माजीमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाली आहेत, याबाबत शिवसेनेच्या वतीने,सोशल मिडीयावर माहिती प्रसिद्ध करुन आमदार संजय जगताप यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे का?
शिवसेनेने केलेला दावा खरा आहे? याबाबत तालुक्यात मात्र चर्चा सुरू आहे, त्यामुळे कोण कोणाच्या काम श्रेय लाटत आहे,हा संशोधनाचा विषय बनला आहे,हे मात्र नक्की आहे की पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून काॅंग्रेस शिवसेनेत श्रेय वादासाठी चढाओढ सुरू आहे.