प्रत्येक्ष काम सुरू झाल्याने शेतकरी आनंदी
पुरंदर
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गुंजवणी प्रकल्पाचे काम भोर वेल्ह्यात सुरू केल्यानंतरआता पुरंदर तालुक्यातही पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील आठवड्यात जलसंपदा विभागाशी चर्चाकरून शिवतारे यांनी तिन्ही तालुक्यात पाईपलाईनचे काम सुरू केल्यास योजना लवकर पूर्ण करता येईल असे सुचवितपुरंदर तालुक्यातही लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यानुसारतालुक्याची हद्द सुरू होत असलेल्या तोंडल गावापासून आज कामाला सुरुवात करण्यात आली. याबाबत बोलताना माजीसभापती अर्चना जाधव म्हणाल्या, तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब शिवतारे यांच्या लक्षात आणूनदिल्यानंतर एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. गुंजवणी हा देशातील पहिला बंद जलवाहिनीअसलेला प्रकल्प आहे. शिवतारे यांच्या संकल्पनेतून ही योजना आकार घेत असून राज्यासहित देशपातळीवर सुद्धा हेमॉडेल स्वीकारण्यात आले आहे. दोन्ही सरकारांनी यापुढील काळात प्रवाही कालवा पद्धत बंद करून जलवाहिनीचे धोरणस्विकारले आहे. ही योजना पुरंदर तालुक्यासाठी कल्याणकारी ठरणार असून तालुक्याचे भविष्य त्यातून साकारले जाणारआहे असेही जाधव म्हणाल्या.
त्या संघर्षांतही शिवतारे जिंकतील माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुंजवणीसाठी केलेला संघर्ष जीवावर बेतला होता. किडनीच्या आजारानं त्यांना घेरलं असतानाही त्यांनी गुंजवणीसाठी मोठा लढा दिला. कोर्टकचेऱ्या, विस्थापितांचीआंदोलनं, प्रतिस्पर्ध्यांचा छुपा विरोध अशा सगळ्यांना अंगावर घेत शिवतारे यांनी धरण पूर्ण केलं. निवडणुकीत पराभूतझाल्यावरही शब्दाला जागत पाईपलाईनचे काम मार्गी लावले. पण कौटुंबिक कलहाने त्यांना पुन्हा घेरलं. ब्रीच कँडी मध्येपुन्हा त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ते त्यावरही मात करतील असा विश्वास त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.