पुरंदर तालुक्यात कोरोणा वाढतोय?पुरंदरमध्ये आज ५२ जण कोरोणा बाधीत

पुरंदर तालुक्यात कोरोणा वाढतोय?पुरंदरमध्ये आज ५२ जण कोरोणा बाधीत

पुरंदर

पुरंदर तालुक्यात कोराणा बाधीतांच्या वाढीचा आलेख काही कमी व्हायच नाव घेत नाही.आज पुरंदर तालुक्यामध्ये ५२ जण कोरोणा बाधीत झाले आहेत.

आज पुरंदर तालुक्यामध्ये २१० संशयीतांची कोविड १९ चाचणी करण्यात आली त्यामध्ये ५२ जण हे कोरोणा बाधीत झाल्याचे दिसुन आले आहे.

पुरंदर तालुक्यात आज ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर तालुक्यामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या ही २५० ईतकी आहे.

आज पर्यंत पुरंदर तालुक्यामध्ये १६६४५२ इतक्या नागरिकांचे कोविड लसीकरण पुर्ण झालेले असल्याचे पुरंदर तालुका आरोग्य विभागाने सांगीतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *