पुणे
पुरंदर तालुक्याला जीवनदायिनी असणाऱ्या पूर्ण उपसा जलसिंचन योजनेची रविवार दि.(२६) आढावा बैठक पार पडली यावेळी मुख्य अभियंता,कार्यकारी अभियंता,शाखा अभियंता तसेच शेतकरी यावेळी उपस्थित होते.पुरंदर हवेली चे आमदार विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
यावेळी संपूर्ण योजनेचा आढावा विजय शिवतारे यांनी घेतला. तसेच अनधिकृत पाणी वापरणाऱ्यांची ओळख पाठवा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा अशा सूचनाही विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या मुख्य पाईपलाईनला कोणतीच पाईपलाईन नसावी. अशी ही चर्चा या ठिकाणी झाली.
येणाऱ्या काळात संपूर्ण पुरंदर उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर चालवली जाणार असल्याचे सुतोवाच विजय शिवतारे यांनी केले. या बैठकीला पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या लाभार्थी गावातील शेतकरी बहुसंख्य उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील सिंचन क्षेत्र सर्वात मोठे असल्याकारणाने सर्वात जास्त पाणी हे पुरंदरला मिळावे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा विस्तार वाढवायचा असून रिसे, पिसे,राजुरी, नायगाव, पांडेश्वर या गावांचा देखील समावेश येणाऱ्या काळात करण्यात येणार आहे. तसेच योजनेचे आवर्तन ठरवा. कामात पारदर्शकता असली पाहिजे: विजय शिवतारे,आमदार, पुरंदर हवेली
ही योजना आम्ही सक्षमपणे चालवणार डिसेंबर २०२५ पर्यंत ३ टीएमसी पाणी देणार:अशोक शेट्टे ,कार्यकारी अभियंता
येणाऱ्या काळात बापू हे तो मुनकीन है नुसार पुरंदर उपसाच्या माध्यमातून नक्कीच पुरंदर तालुक्यात सर्व शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच चांगली क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही:ॲड. नितीन कुंजीर: युवा सेना प्रमुख, पुरंदर