पुण्यातील अजब प्रकार !!!!!                    चहाची तलप आली अन् अपघात झाला, ट्रॅक्टरने दिली सात वाहनांना धडक, त्यानंतर…

पुण्यातील अजब प्रकार !!!!! चहाची तलप आली अन् अपघात झाला, ट्रॅक्टरने दिली सात वाहनांना धडक, त्यानंतर…

पुणे

बिबवेवाडी येथे अप्पर जुना बस स्टॉपजवळ अपघात झाला आहे. एका ट्रॅक्टरने ७ वाहनांना धडक दिली आहे. ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या उतारावर ट्रॅक्टर थांबवला होता. मात्र, चालकाला चहाची तलप आवरता आली नाही. त्यामुळे उतारावर ठेवलेला ट्रॅक्टर आपोआपच सुरु झाला. दरम्यान, या ट्रॅक्टरने ७ वाहनांना धडक दिली. या अपघातात एक जण जखमी झाला असून ट्रॅक्टर चालकाविरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रॅक्टर चालकाला चहा पिण्याचा मोह आवरला नाही. त्या चालकाने भररस्त्यात उतारावर ट्रॅक्टर थांबवला. त्यानंतर चालक चहा पिण्यासाठी गेला असता उतारावरुन अचानक ट्रॅक्टर खाली जावू लागला.

त्यानंतर या ट्रॅक्टरची धडक ७ वाहनांना बसली. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात बिबवेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातील बिबवेवाडी येथील अप्पर जुना बस स्टॉप येथे एक भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरच्या झालेल्या या अपघातात एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. बिबवेवाडीतील अप्पर जुना बस स्टॉप येथे एक ट्रॅक्टर चालक आपली ट्रॅक्टर उभा करून चहा घ्यायला गेला, मात्र तो हॅन्ड ब्रेक लावायला विसरला आणि तसाच निघून गेला.

दुर्दैवाने तो सगळा रस्ता उताराचा असल्याने तो ट्रॅक्टर आपोआप पुढे गेला आणि उतार असल्याने त्या ट्रॅक्टरची वेग वाढला आणि ट्रॅक्टरने ७ वाहनांना धडक दिली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *