पुण्यात अग्नितांडव!!!!!! गॅसची पाईपलाईन फुटली

पुण्यात अग्नितांडव!!!!!! गॅसची पाईपलाईन फुटली

पुणे

पुण्यातील सिंहगड रोड येथील दांडेकर पुलाजवळ MNGLची गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहित समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळं दूरपर्यंत आजीचे लोळ पसरले होते.परिसरात लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. MNGL पाईपलाईन जरी बंद करण्यात आली असली तरी आजूबाजूला 3 ठिकाणी आग पसरली असल्याने अग्निशामन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. अखेर मध्यरात्री लागलेली ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरु असल्यानं आग आटोक्यात येत नव्हती. या घटनेमुळं सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक थांबवण्यात आली होती. घटनेचीमाहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *