पुणे जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायमधील खळबळजनक प्रकार!!!ग्रामसेवकाकडून तब्बल दहा लाख रुपयांची वसुली सुरू तर तत्कालीन सरपंचाला पाच लाख रुपये व्याजासह सात दिवसात भरण्याचे आदेश

पुणे जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायमधील खळबळजनक प्रकार!!!ग्रामसेवकाकडून तब्बल दहा लाख रुपयांची वसुली सुरू तर तत्कालीन सरपंचाला पाच लाख रुपये व्याजासह सात दिवसात भरण्याचे आदेश

पुणे

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायत च्या माजी सरपंचाला बजावली नोटिसीमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यवत ग्रामपंचायत 15 लाख 74 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका ग्रामपंचायत तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व सरपंचावर ठेवण्यात आले असून सरपंचाला पाच लाख रुपये व्याजासह सात दिवसात भरण्याचे आदेश दिले आहेत. दौंडच्या गटविकास अधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.

ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी केकान यांचे विरोधात विभागीय चौकशी केल्याने तर त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले. ग्रामपंचायत मध्ये संगनमताने 15 लाख 74 हजार रुपयांचा अपहार निश्चित करण्यात आला. त्यानंतर केकान यांना सक्तीने सेवानिवृत्त करणे व त्यांना देय असणारे निवृत्तीवेतनातून वसूल पात्र रक्कम वसूल करण्याच्या आदेश दिले आहेत.

दरम्यान अपहारातील उर्वरित चार लाख 88 हजार 544 रुपयाची रक्कम तत्कालीन सरपंच शामराव शेंडगे यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *