पुणे जिल्ह्यातील “या” गावात सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात; 24 मुली जखमी

पुणे जिल्ह्यातील “या” गावात सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात; 24 मुली जखमी

पुणे

बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. इचलकरंजी येथील एका क्लासकडून 8 ते 10च्या मुलींसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.चालकाचे गाडीवरील नियत्रन सुटल्याने अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातामध्ये तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून, 24 मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर बारामतीतील महिला रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहल औरंगाबाद आणि शिर्डीला गेली होती. मात्र शिर्डी येथून परत इचलकरंजीकडे येत असताना पाहुणेवाडी गावात या बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून, 24 मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे.

या बसमध्ये एकूण 48 मुली व 5 शिक्षक प्रवास करत होते. या अपघाताचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *