पुणे जिल्ह्यातील “या” गावात भीषण अपघात,भरधाव गाडीची ५-६ गाड्यांना जोरदार धडक; दोघांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील “या” गावात भीषण अपघात,भरधाव गाडीची ५-६ गाड्यांना जोरदार धडक; दोघांचा मृत्यू

पुणे

पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या गाडीने ५ ते ६ गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.

तीव्र उतारावर हा अपघात झाला आहे. मोहम्मदवाडी परिसरात अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहायल मिळत आहे. कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

अपघाताचे काही फोटो देखील समोर आले आहेत. फोटोंवरुन अंदाज लावला जाऊ शकतो की ही धडकी किती जोरदार होती. अनेक गाड्याचा अक्षरश: चुराडा झाला आहे. एक रिक्षा उलटली आहे. तर फुटपाथवरील काही दुकानांचंही नुकसान झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *