पुणे जिल्ह्यातील “या” गावात भरधाव कार तीनवेळा उलटली; भयानक अपघातात माय-लेकासह एकाचा जागीच मृत्यू

पुणे जिल्ह्यातील “या” गावात भरधाव कार तीनवेळा उलटली; भयानक अपघातात माय-लेकासह एकाचा जागीच मृत्यू

पुणे

पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात स्वीफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आई आणि मुलासह अन्य एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर-पुणे या लेनवर पहाटे पावणेचारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी अपघातातील जखमी व्यक्तीला तातडी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर आई मुलासह एका व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला. संदीप राजाभाऊ माळी (वय ३५ वर्ष), बालाजी केरबा तिडके वय (४८) आणि सरस्वती राजाभाऊ माळी (वय ६१ वर्ष) असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.

हे तिघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त कुटुंब हे सोलापूरवरून पुण्याच्या दिशेने कारने प्रवास करीत होते. पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास कार इंदापूर तालुक्यातील डाळज नं. १ परिसरात आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.काही कळण्याच्या आतच कार भिगवण बस स्थानकापासून जवळच उतारावर पलटी झाली. या भीषण अपघातात कारमधील मायलेकासह एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

तर एक जण गंभीर जखमी झाला. चंद्रकांत रामकिशन गवळी (वय ५४ वर्ष ) असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमी व्यक्तीला तातडीने नजीनकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मायलेकासह अन्य एका व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *