पुणे जिल्ह्यातील भयानक प्रकार!!!!!!लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीचा हत्या, रिक्षात मृतदेह टाकून लावला आईच्या घरासमोर

पुणे जिल्ह्यातील भयानक प्रकार!!!!!!लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीचा हत्या, रिक्षात मृतदेह टाकून लावला आईच्या घरासमोर

पुणे

ऐन गणेशोत्सवात पिंपरी- चिंचवडमध्ये तीन दिवसांत दुसरी हत्या झाली आहे. आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या करून, तिचा मृतदेह रिक्षात ठेवून प्रियकर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना काल रात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान घडली असून, सकाळी ती उघडकीस आली आहे. शिवानी सुपेकर असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके उडाले होते, त्यानंतर रिक्षाचालक विनायक आवळे सोबत तिचे प्रेम संबंध जुळले. गेली दोन वर्षे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आळवून हत्या केली.

मग, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली आणि तो पसार झाला. काहींना आज सकाळी रिक्षात शिवानी बसल्याचं दिसलं, पुढं ती मृत पावल्याचं लक्षात आलं. वाकड पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे. ही हत्या प्रियकर विनायकने केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेली आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दोन दिवसांपूर्वी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच अली अन्सारीची दगडाने ठेचून हत्या झाली होती. आता या महिलेचा गळा घोटण्यात आला. त्यामुळं ऐन गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडी नित्याची झालेली असतानाच आता पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये हत्या सत्र सुरू होतंय की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कारण ऐन गणेशोत्सवात तीन दिवसांतच दोन हत्या झाल्यात. तसेच गणपतीची प्रतिष्ठापना झाली तेव्हापासून अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, त्यापैकी काही गुन्ह्यांमुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *