पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!!!                   “या” ग्रामीण रुग्णालय परिसरात बत्ती गुल

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!!! “या” ग्रामीण रुग्णालय परिसरात बत्ती गुल

पुणे

दौंड तालुक्यातील यवत ग्रामीण रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी संपूर्णपणे अंधार असल्याचे तक्रार खुद्द रुग्ण कल्याण समिती सदस्य मयूर दोरगे यांनी केली आहे.

जवळपास एक वर्षापासून ग्रामीण रुग्णालय परिसरात हा अंधार पसरलेला आहे याकडे आरोग्य विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत.

जनसामान्यांच्या आयुष्यात आरोग्य सेवेतून प्रकाश देण्याचे काम आरोग्य विभाग करत आलेला आहे परंतु ग्रामीण रुग्णालय परिसरातील अंधार दूर करण्यात वैद्यकीय अधीक्षक शशिकांत इरवाडकर अयशस्वी ठरले आहेत.

सदर बाबत अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या येऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी मूकबधिर असल्याची भूमिका घेताना दिसून आले आहेत.

ग्रामीण रुग्णालय परिसरात अंधारामुळे अघटित अपघात,मोठा गुन्हा घडू शकतो त्यास नाकारता येणार नाही म्हणून आता तरी प्रशासनाने जागे व्हावे आणि परिसरात दिवे लावून प्रकाश पाडावा हीच सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

रुग्ण कल्याण समितीचे सदस्य मयूर दोरगे यांनी रुग्णालय परिसरात असलेल्या अंधारा विषयी अनेक महिन्यापासून पाठपुरावा केला असून देखील आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग अकार्यक्षम ठरले आहेत.

याबाबत वैद्यकीय अधीक्षक शशिकांत इरवाडकर यांना संपर्क केला असता “ग्रामीण रुग्णालय येथे दिवे लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असून त्यांना याबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार केली आहे परंतु त्यांच्याकडे बजेट नसल्याचे त्यांच्याकडून उत्तर येत असल्याचे सांगितले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *