पुणे जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना !!!!                                              भरधाव कार डिव्हाडरला धडकून हवेत उडाली; समोरुन येणाऱ्या कारवर आपटली,व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

पुणे जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना !!!! भरधाव कार डिव्हाडरला धडकून हवेत उडाली; समोरुन येणाऱ्या कारवर आपटली,व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर एका भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हायवेवरील डिव्हाडर ओलांडून बोलेरो कार दुसऱ्या लेनमध्ये अक्षरश: उडून आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हवेली येथील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाशेजारी ही घटना घडली.सोलापूरच्या दिशेने निघालेली बोलेरो गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

बोलेरो कार रस्त्याच्या डिव्हाडरवरून पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळली. रविवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. जखमींना लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *