पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार !!!   “या” गावात सापडली बॉम्ब सदृश्य वस्तू;भयानक घटनेनं गावात भीतीचं वातावरण

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार !!! “या” गावात सापडली बॉम्ब सदृश्य वस्तू;भयानक घटनेनं गावात भीतीचं वातावरण

पुणे

इंदापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील एका गावात शेतकऱ्याला बॉम्ब सारखी एक वस्तू सापडलीये. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील टणू गावात एका शेतकऱ्याला आपल्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळली.

टणू गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दत्तात्रय मोहिते यांच्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. त्यानंतर या शेतकऱ्यानं पोलिसांच्या 112 ह्या हेल्पलाईनला संपर्क केला. तसेच या संदर्भात माहिती दिली.माहिती मिळताचं इंदापूर पोलीस आणि बॉम्ब शोध व नाश पथक, BDD पथक या ठिकाणी दाखल झाले आहे.

या श्वान पथकाने ही वस्तू डिटेक्ट केली असून थोड्याच वेळात या ठिकाणी बॉम्ब शोध व नाश पथकाची टीम दाखल होणार आहे. त्यानंतर ही वस्तू खरंच बॉम्ब आहे का की अन्य काही आहे याबाबत उलगडा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *