पुणे (प्रतिनिधी )
.
पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणुन ओळखल्या जाणार्या पिंगोरी गावात कोणत्याही मोबाईल कंपन्यांचे टाॅवर व नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय दुर करण्याची मागणी दत्ताञय फडतरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी मा.उद्धव ठाकरे यांकडे होती . त्या पञाची दखल घेतली असल्याचे पञ फडतरे यांना नुकतेच मिळाले आहे. ते तीन वर्षौपासुन पिंगोरीत मोबाईल नेटवर्क मिळण्यासाठी टाॅवर मंजुर होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत, यापुर्वी त्यांनी स्थानिक आमदार,खासदार व पालकमंञी यांच्याशी पञव्यवहार केला आहे. परंतु त्याकडे दुर्लक्षच होत होते. आश्वासनांपलीकडे काहीच होत नसल्याने त्यांनी राज्याच्या मुख्यमंञ्यांशी पञव्यवहार केला होता.
सैनिकांच्या गावातील नेटवर्क प्रकरणी राज्यशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असुन हे प्रकरण कक्ष आधिकारी, माहीती तंञज्ञान विभागाकडुन पुढे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
डिजिटल इंडीया, कँशलेस व्यवहार, मोबाईल वाँलेट ,डिजीटल ग्रामपंचायती, बायोमँट्रीक राशन व्यवस्था ,डिजीटल साक्षरता अभियान राबविले जात आहे .दुसरीकडे पुरंदर मधील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या गावात कोणत्याही प्रकारच्या मोबाईल कंपन्यांना टाॅवर व नेटवर्क उपलब्ध नाही, यामुळे नागरिकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे .देशाला स्वातंञ्य होवुन सत्तर वर्षे पुर्ण झाली परंतु ,राज्यशासन नागरिकांना इंटरनेट सारखी मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देत नसल्याने ग्रामस्थांमधुन संताप व्यक्त आहे.जवळपास प्रत्येक घरातील एक जवान भारतीय लष्करात जावुन देशाची सेवा करत आहे. लष्करातील जवानांना आपल्या कुटुबांशी संपर्क साधता येत नाही. पिंगोरीमध्ये जिल्हा ,शहर व किंवा इतर भागातुन संपर्क साधल्यास कोणत्याही कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क उपलध्ब होत नसल्याचे फडतरे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले होते.
करोना प्रादुर्भावामुळे आॅनलाईन शिक्षणाची सुविधा सुरु करण्यात आली आहे परंतु मुलांना आॅनलाईन शिक्षण ही घेता येत नाही ,ते आता घेणे शक्य होणार डोंगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने या भागात मुलांनी रेंजसाठी डोंगर माथ्यावर जाणे धोकादायक ठरत आहे. त्यांची अडचण लवकरच दुर होउ शकणार आहे. मोबाईलला रेंज येण्यासाठी टाँवर बांधणीचे ,प्रत्यक्षात लवकर काम सुरु व्हावे अशी अपेक्षाही फडतरे यांनी व्यक्त केली आहे.