निळुंज ग्रामपंचायत सरपंचपदी अश्विनी बनकर यांची बिनविरोध निवड

निळुंज ग्रामपंचायत सरपंचपदी अश्विनी बनकर यांची बिनविरोध निवड

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील निळुंज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस,कॉंग्रेस आघाडीच्या अश्विनी उमेश बनकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुंभारवळण विभागाचे मंडल अधिकारी दुर्गादास शिळकंदे यांनी काम पाहिले.

यावेळी ग्रामसेवक सुरेश जगताप व तलाठी कांबळे यांनी त्यांना या कामी सहकार्य केले.येथील माजी सरपंच रूपाली जगताप यांनी आपला निर्धारित कालावधी पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवरती ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.


यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश होले ,माजी सरपंच रूपाली जगताप, उपसरपंच उमेश बनकर ,रूपाली बनकर,
उज्वला बनकर, समिर बनकर उपस्थित होते.
निवडीनंतर माजी सरपंच विलास बनकर, अशोक बनकर, तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ बोरावके,शरद जगताप,अनिल बनकर, किसन जगताप, ज्ञानोबा बनकर,अतुल जगताप, रामचंद्र लडकत, कैलास बनकर, पोलीस पाटील सीमा बनकर, नारायण जगताप यांनी नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन करत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *