निरेतील धक्कादायक प्रकार !!!!!            पुणे विद्यापिठीची बनावट कागदपत्रे तयार करणार्या टोळीचा पर्दाफ़ाश

निरेतील धक्कादायक प्रकार !!!!! पुणे विद्यापिठीची बनावट कागदपत्रे तयार करणार्या टोळीचा पर्दाफ़ाश

पुरंदर

या प्रकरणात तिघा जणांना अटक करण्यात आली असून  त्यांच्या माहितीवरून पुढे इतर अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा गोरख धंदा नीरा याठिकाणी सुरू असून बनावट प्रमाणपत्र घेऊन किती जणांनी नोकऱ्या मिळविल्या आहेत. याचा शोध पोलीस घेणार का?

विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये हा प्रकार राजरोसपणे सुरू होता हे धक्कादायक आहे. बनावट प्रमाणपत्रामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांचा हक्क हिरावून घेतला गेला आहे!.हि बनावट प्रमाणपत्र देत अनेकांनी नोकऱ्या लाटल्याचे प्रकरणे चौकशी अंती  समोर येतील या बनावट प्रमाणपत्र रॅकेट मध्ये आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे या प्रमाणपत्रासाठी लागणारा कच्चा माल तसेच तिची शाई व त्याची मांडणी हुबेहूब करुन प्रशासनाच्या डोळय़ांत धुळफेक करणारा प्रशासनातीलच एक साथीदार असण्याची शक्यता आहे.बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेट चा पर्दाफाश झाल्यानंतर या  टोळीचे बनावट  प्रमाणपत्र बनवण्याचे काम ते किती दिवसांपासून करत होते ?

तसेच हे प्रमाणपत्र आजपर्यंत किती जणांना दिली आहे व त्यापासून कित्येकानी या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीसाठी पुढील शिक्षणासाठी, बढतीसाठी व वेतनवाढीसाठी उपयोग केला आहे हे तपासणे गरजेचे आहे ज्याप्रमाणे बनावट प्रमाणपत्र बनवणारी जेवढे गुन्हेगार तेवढाच त्या बनावट प्रमाणपत्रांचा फसवणूक करून वापर करणे करणारा व्यक्ती ही गुन्हेगार आहे. यामुळे आता ज्यांनी या बनावट प्रमाणपत्राचा उपयोग केला आहे त्यांच्यावरही कारवाई होणार का हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *