“निबंध लिहिलेला कागद गाडीत ठेवून अपघात केला तर चालेल का?” पोर्शे कार अपघातावर खोचक सवाल….

“निबंध लिहिलेला कागद गाडीत ठेवून अपघात केला तर चालेल का?” पोर्शे कार अपघातावर खोचक सवाल….

पुणे

विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातील अपघाताच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. पुण्यातील कल्याणीनकर याठिकाणी पोर्शे कारच्या धडकेत २ तरुणांचा मृत्यू झाला. १७ वर्षीय वेदांत अगरवाल या तरुणाने दारुच्या नशेत त्याच्या आलिशान गाडीने मोटारसायलकाला दिलेल्या धडकेत, या तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेत २४ वर्षीय तरुण-तरुणीचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आरोपी वेदांतची अवघ्या १५ तासात सुटका झाली. आरोपीला या प्रकरणात निबंध लिहिण्यासारख्या अन्य काही किरकोळ अटींवरुन जामीन मिळाला आणि त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असणाऱ्या पवन वाघुळकरने एक उपहासात्मक व्हिडिओ शेअर करत न्यायव्यवस्थेवर उपस्थित केला आहे.पवनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो पुण्यातील रस्त्यावर एक बोर्ड घेऊन उभा आहे.

येणारे-जाणारे त्याच्या हातातील बोर्ड वाचण्यासाठी थांबत आहेत आणि त्याने विचारलेला सवाल विचारात टाकणारा आहे. पवनने या बोर्डवर असा प्रश्न लिहिला आहे की, ‘निबंध लिहिलेला कागद गाडीत ठेवून अपघात केला तर चालेल का?’ त्याने हा व्हिडिओ शेअर करताना ‘पुणे तिथे काय उणे’ असे कॅप्शनही दिले आहे.


या इन्फ्लूएन्सरच्या पोस्टवर असंख्य कमेंट आल्यात. न्याय व्यवस्थेवर ताशेरे ओढणाऱ्या या कमेंट आहेत. शिवाय पवनने कल्याणीनगरमध्ये घडलेल्या घटनेविषयी आवाज उठवल्याने त्याचे कौतुकही होते आहे.रविवारी पोलिसांनी आरोपी युवकाला जुवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर केले, याठिकाणी त्याला जामीन मिळाला.

बोर्डाने त्याला आरटीओमध्ये जाऊन वाहतूक नियमांचे वाचन करून १५ दिवसांच्या बोर्डासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले. याशिवाय रस्ते अपघात आणि त्यावर उपाय या विषयावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचे त्याला आदेश देण्यात आले.आरोपीला येरवडा वाहतूक पोलिसांसोबत १५ दिवस काम करावे लागेल, अपघातावर निबंध लिहावा लागेल, मद्यपान सोडण्यासंदर्भात डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागतील आणि मानसोपचार सल्ला घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *