नावाचे पावित्र का राखले जाते का?

नावाचे पावित्र का राखले जाते का?

निरा

छत्रपती शिवाजी महाराज चौक निरा शिवतक्रार अभिमानाने जनतेने या चौकाला नाव दिले. परंतु त्याचे पावित्र्य राखलेजात नाही.  या चौकात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम होतात. देशावर कोणतेही संकटआले तरी जनता न सांगता या चौकात धावून येते.

परंतु महाराजांचे विषयी अभिमान असणार्‍या या चौकात महाराजांचे नावाचा साधा नाम फलक सुद्धा नाही. त्यातचवाढदिवस, पदावरील निवड, भावपूर्ण श्रद्धांजली आणि जाहिराती चे फलक कायम लागलेले असतात. त्यामुळे या चौकाचेनाव बदलले जाते की काय याची भीती वाटायला लागलेली आहे. कोरोना महा मारीत अनेक भावपूर्ण श्रद्धांजली चे फलकपाहावे लागत असलेने प्रवाशावर व जनतेवर दडपण येत होते. आजार कमी होण्याऐवजी बळावले जात होते. वाढदिवस वपदावरील निवड हे फलक तर कायमच. आशा फलकामुळे रहदारीस अडथळा येत आहे व त्यांच्याकडे पाहता पाहताअपघात होत आहेत. गावाचे भूषण असलेला चौक परंतु लोक चौकाचे कडेला उघड्यावरच लघुशंका करीत आहेत.

अशा फलकांना पोलीस व ग्रामपंचायत परवान्याची आवश्यकता असते. या पूर्वीचे पोलीस अधिकारी श्री. अंकुश मानेयांनी कडक नियम राबवले होते. त्यामुळे बेकायदेशीर फलकावर अंकुश होता.  ग्रामपंचायतीला हे एक उत्पन्नवाढीचेसाधन आहे परंतु याबाबत त्यांची उदासीनता दिसून येते. दुखवायचे कोणाला.

वाल्हे येथील एका सुशिक्षित नेत्याने व बारामती तालुक्यात प्रत्येक ठिकाणी महिला नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त असेफलक न लावता जनतेच्या कोरोना लसीकरणाला प्राधान्य दिले परंतु येथे असे झालेले दिसून येत नाही. जनता राम भरोसेकोणाचे कोणाला सोयरसुतक नाही.

छत्रपती शिवाजी महाराज चौक निरा शिवतक्रार बाबत उदासीन राज्यकर्ते काही करत नसतील तर महाराजांचे व गावाविषयी अभिमान असणारे एक संघटन स्वच्छ नीरा सुंदर निरा या तत्त्वाप्रमाणे चौकाचे सुशोभिकरण करणार आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *