नवागतांच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पुरंदर तालुक्यातील “या” जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत

नवागतांच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पुरंदर तालुक्यातील “या” जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत

पुणे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांबळी येथे इयत्ता पहिलीत नवागत मुलांच्या स्वागताची तयारी शाळेची सर्व साफसफाई,सजावट,करून, मुलाच्या लेझिम पथकाने वाजत गाजत नवगत मुलांना शाळेच्या प्रवेशद्वारा पासून शाळेत मान्यवरांच्या समवेत आणण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन पुणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व पुरंदर प.स.चे गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी,सरपंच प्रतिभा सं.कदम यांच्या हस्ते करण्यात आले.


संतोष पाटील यांनी आपल्या मनोगतात चांबळीं गावचे सुपुत्र दहशत वादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेले स्वर्गीय अशोक कामठे याचे हे गाव असून या शाळेला व गावाला शैक्षणिक व शौर्याचा वारसा आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेऊन आपल्या गावचा वारसा टिकावावा शाळेचा नावलौकिक करावा,शाळेला जरी जिल्हा परिषदेचे नाव असेल तरी खरी शाळा ही गावाचीच आहे, गावातील ग्रामस्थांनी शाळेला भौतिक सुविधेसाठी भरघोस मदत केली आहे.

शिक्षक व ग्रामस्थ हातात हात घालून काम करतात त्यामुळे शाळेचा सर्वांगीण विकास होत आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेत खरे गुणवत्तापूर्ण शिक्षणं मिळते मी ही जि.प.शाळेचा विद्यार्थी आहे मला याचा अभिमान आहे.प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षांकडे सर्वांनी लक्ष देऊन जास्तीत जास्त मुले गुणवत्ता यादीत येतील याकडे लक्ष द्यावे,यावेळी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला.


यावेळी पहिलीत नवागत मुलांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,
पाठ्यपुस्तक व लेखन साहित्य वाटप शाळेतील सर्व मुलांना करण्यात आले,यावेळी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या वेळी
गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी व विस्तार अधिकारी प्रताप मेमाणे, विषय तज्ञ भरत जगदाळे, चांबळी गावचे सरपंच प्रतिभा कदम, संजय आबा कामठे, दत्तात्रय शेंडकर,नाना शेंडकर,प्रकाश कामठे ,शहाजी कामठे,मारुती कामठे,भाऊसाहेब कामठे,संदीप कदम, विकास कामठे,कुंभारकर, ग्रामसेवक रमेश राऊत आणि अंगणवाडीताई,ग्रामस्थ,पालक बहु संख्येने उपस्थित होते.
प्रवेश उसत्वाचे आयोजन शिक्षिका भारती कावडे व सपना घम यांनी केले.प्रास्ताविक आदर्श शिक्षक मोहन जगताप यांनी केले,आभार मुख्याध्यापिका शोभा कामथे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *