नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी. गुवाहाटीत संशोधनासाठी निवड

नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी. गुवाहाटीत संशोधनासाठी निवड

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी गुवाहाटी आसाम राज्य येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे.”इंडीयन डिप्लोमँटीक हिस्टरी अॅंन्ड इंटरनॅशनल हिस्टरी” यामध्ये ते संशोधन करणार आहेत.नवनाथ यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

फडतरे यांनी साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातुन पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले असुन इंडीयन इंट्यिट्युट आॅफ टॅक्नोलाॅजी अर्थात आय.आय.टी गुवाहाटी मधुन पदव्युत्तर पदवी पुर्ण केली असुन यापुर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयु) दिल्ली मधुन “मास्टर आॅफ फिलाॅसाॅफी इन चायनीज स्टडीज” (एम.फिल ) निवड झाली आहे. मराठी माध्यमांतुन शिक्षण घेवुनही कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभुमी नसताना नवनाथ यांनी आय.आय.टी.प्रवेश , नेट , गेट आणि आता भारतातील नामांकीत असणार्या आय.आय.टी गुवाहाटी आसाम राज्य येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे .

नवनाथ यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण , आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावात वर्गखोल्या नसल्याने गावातील मंदिरात बसुन पुर्ण केले. अकरावी -बारावीत असताना जास्त वेळ कॅालेज न करता शेतातील कामे तसेच ,डोंगराला जनावरांना चारायला नेताना तिकडे इंग्रजी पुस्तकांचे वाचन तसेच प्रवास करताना बसमधुन ये- जा करताना मोकळ्या वेळेत इंग्रजी व्याकरण आणि शब्दभंडार वाढविण्यासाठी कायम भर देत असत ,भविष्यात याचा त्यांना फायदा होत गेला.

पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधुन शिक्षण दिल्यानंतरच ,खासगी शिकवणीसाठी लाखो रुपयांची फी भरल्यानंतरच मुलं -मुली यशस्वी होतात हे चुकीचे असल्याचे सिदध करुन दाखवले आहे. आत्तापर्यंतचा शैक्षणिक आलेख कोणताही क्लास न लावता उंचावला आहे. परिस्थिताचा बाऊ न करता कोणतीही कारणं न सांगता भरपुर मेहनत आणि ज्या क्षेञात जायचे ,त्या क्षेञात स्व: ला पुर्णपणे झोकुन दिले तर सर्वसामान्य गोरगरिब शेतकरी कुटुंबातील मुलं -मुली देखील देखील आपल्या आई- वडीलांचे नाव उंचावुन समाजात चांगले आदर्श निर्माण करु शकतात असे फडतरे यांनी सांगितले. विविध राष्ट्रीय परिक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवुन नवनाथ आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. बोपगाव या छोट्याशा गावातील नवनाथ यांची गरुडक्षेप सर्वांना निश्चितच प्रेरणादायी आहे.

फडतरे यांचे वडिल निवृत्त सैनिक आहेत. बंधू दत्ताञय यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असुन शिवाजीनगर ,पुणे येथुन वकिलीचे पुढिल शिक्षण घेत आहेत, आईचे शिक्षणासाठी मिळत असलेले पाठबळ आणि प्रोत्साहन ,बंधु राकेश यांचे सर्वच बाबतीत सहकार्यामुळे यश मिळाल्याची भावना नवनाथ यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *