पुरंदर
सासवड पोलिस स्टेशन येथे सौ.मनिषा संदिप खवले वय 42 वर्ष धंदा गृहीणी रा. सर्वे नं. 41/ब प्लॉट नं. 50जाधवनगर वडगाव ब्रु. ता हवेली यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी संदिप काळुराम जगदाळे रा. गराडे ता पुरंदर जि पुणे व एक अनोळखी इसम नाव पत्ता माहीत नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता. 29/12/2022 रोजी सायंकाळी 5:15 वा .चे सुमारास मौजे थापेवाडी गराडे ता पुरंदर जि पुणे येथील आमचे शेतजमिनीन गट नं. 311 मध्ये अतीक्रमण करुन वॉल कंपाऊंड करत असताना त्यास विचारणा केल्याचे कारणावरुन त्याचा मनात राग धरुन संदिप काळुराम जगदाळे रा. गराडे ता पुरंदर जि पुणे याने मला व सासुला हाताने धक्काबुक्की करुन साडीला हात लावुन बायामाणुस मी पाहणार नाही असे म्हणुन शिविगाळ करुन अंगाला हात लावुन झेडझाड केली. संदिप जगदाळे व त्याचे बरोबर असणा-या इसमाने माझे पती व सासरे यांना हाताने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणुन त्याचेविरुध्द तक्रार दिली आहे.
पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौजदार चिखले करत आहेत.