धक्कादायक !!!!! फरशी कापण्याच्या कटरने गळा कापला, “हा” व्यापारी मृतावस्थेत सापडल्याने खळबळ

धक्कादायक !!!!! फरशी कापण्याच्या कटरने गळा कापला, “हा” व्यापारी मृतावस्थेत सापडल्याने खळबळ

सोलापूर : फरशी कापण्याच्या कटरने गळा कापल्यामुळे व्यापारी मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातील बालाजी नगर येथे ही घटना घडली. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.

श्रीकांत रचा यांचा मृतदेह राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. फरशी कापण्याच्या कटरने गळा कापलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. श्रीकांत रचा हे करमाळा शहरातील कापड व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिक आहेत.


त्यांचा खून झाला, की त्यांनी आत्महत्या केली, याचा तपास करमाळा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *