धक्कादायक!!!!                                     पोलिस अधिकाऱ्याचा पुन्हा दारूच्या नशेत घातला राडा;महिलांना केली अश्लील शिवीगाळ

धक्कादायक!!!! पोलिस अधिकाऱ्याचा पुन्हा दारूच्या नशेत घातला राडा;महिलांना केली अश्लील शिवीगाळ

पुणे

औरंगाबाद येथून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एससीपी विनयभंग प्रकरण ताजे असताना आणखी प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद पोलिसांचा पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत कारनामा समोर आला आहे. औरंगाबादेत पीएसआयने दारुच्या नशेत महिलेसोबत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. महिलांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेमिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेत पोलीस अधिकाऱ्याने दारुच्या नशेत महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीएसआय अनिल बोडले असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. पोलीस अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर महिलाच चांगल्याच संतापल्या.अनिल बोडले यांनी मद्यधुंद अवस्थेत कॉलनीतील महिलांना अश्लील शिवीगाळ केली. अनिल बोडले यांचा दारुच्या नशेत महिलांना अश्लील शिवीगाळ करताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

पोलीस अधिकारी अनिल बोडले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महिलांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. या महिलांनी मध्यरात्रीपर्यंत जवाहर नगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. त्यामुळे जवाहर नगर पोलिसांना ठाण्यातील पोलिसांना कारवाई करावी लागली. या घटनेनंतर पीएसआय अनिल बोडले यांना जवाहर नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलीस अधिकारी बोडले यांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *