धक्कादायक !!!!!   पुणे जिल्ह्यातील “या” गावात शॉक लागून बाप-लेकासह चार जणांचा मृत्यू

धक्कादायक !!!!! पुणे जिल्ह्यातील “या” गावात शॉक लागून बाप-लेकासह चार जणांचा मृत्यू

पुणे

पुण्यातील भोरमध्ये एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. विजेचा शॉक लागून बाप लेकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.

भोर तालुक्यातील निगेडे गावातील ही घटना घडली आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना शॉक लागल्याने या चौघांचा मृत्यू झाला आहे.

विठ्ठल सुदाम मालुसरे (वय 45), सनी विठ्ठल मालुसरे (वय 26), आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय 55), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय 36) अशी चौघांची नावं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *