धक्कादायक!!!!!              जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत टुल्ल; वर्गातच केली लघुशंका….

धक्कादायक!!!!! जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत टुल्ल; वर्गातच केली लघुशंका….

अमरावती

अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील मेळघाटमधील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओत शिक्षक मध्यधुंद अवस्थेत चक्क वर्गात दारू पिऊन झोपलाय. त्याचवेळी शाळेतील विद्यार्थी मस्ती करताना दिसून येताहेत. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच परिसरातून संताप व्यक्त केला जातोय.

प्राप्त माहितीनुसार, व्हायरल झालेला हा व्हिडिओ धारमी तालुक्यातील कारकरमल येथील जिल्हा परिषद शाळेतील आहे. व्हिडिओत शाळेतील शिक्षक दारू पिऊन वर्गात विचित्र अवस्थेत झोपी गेला आहे. त्याचवेळी आपल्याला ऑफ प्रेड मिळाला म्हणून वर्गातील मुलंही धिंगाणा घालताना दिसत आहेत.
अशातच एक व्यक्ती वर्गात येतो आणि या मद्यपी शिक्षकाला जागी करतो.

इतकंच नाही तर, तो त्याला प्रश्न देखील विचारतो. त्यानंतर हा शिक्षक वर्गातील हलत-डुलतच बाहेर जातो. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षिकाने चक्क जीन्समध्येच लघुशंकाही केलेली असते.

दरम्यान, याबाबत वर्गातील विद्यार्थ्याना विचारलं असता, सर सकाळीच दारू पिऊन आले होते. असं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. असं कृत्य सरांनी पहिल्यांदाच केलं असल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच, गावातील गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *