धक्कादायक!!!!!          ग्रामपंचायत कराची रक्कम “फोनपे” वर स्विकारणे पडले महागात;”या” गावच्या महिला सरपंचास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ठरविले अपात्र

धक्कादायक!!!!! ग्रामपंचायत कराची रक्कम “फोनपे” वर स्विकारणे पडले महागात;”या” गावच्या महिला सरपंचास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ठरविले अपात्र

पुणे

ग्रामपंचायत कराची रक्कम फोन पे द्वारे स्वीकारणे महागात पडले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगावच्या सरपंच सफलता प्रभाकर पाटील यांनी फोन पे द्वारे हि रक्कम स्वीयकारल्याने त्यांचे सरपंच पद आणि सदस्यत्व पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अपात्र ठरविले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील हा प्रकार असून गुंजेगाव ग्रामपंचाय सदस्या मीरा ज्ञानदेव साळुंखे यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. सरपंच सफलता पाटील यांनी ग्रामपंचायत हद्दीतील इको इंडस्ट्रीज या कंपनीकडून पंचवीस हजारांची कराची रक्कम पती प्रभाकर पाटील आणि त्यांचे संयुक्त बँक खाते असलेल्या फोन पेवरून स्वीकारली. ती रक्कम ग्रामपंचायत निधीमध्ये वर्ग न करता परस्पर लाटून भ्रष्टाचार केला आहे. 

सरपंचास मिळणारे मानधनसुद्धा त्यांच्या खात्यावर स्वीकारले. तसेच गावाला पुरविण्यात येणाऱ्या शुद्ध पाणी प्रकल्पात आर्थिक अनियमितता झालेली आहे. यावरून सरपंच बेजबाबदार, बेकायदेशीर कृत्ये करत असल्याची तक्रार मीरा साळुंखे यांनी केली.

या प्रकरणी सफलता पाटील यांचे सरपंच आणि सदस्यपद रद्द करण्याची मागणी देखील मीरा सालंखे यांनी केली होती.यावरून विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशी करून एकूण १३ मुद्यावर सरपंच कर्तव्यात कसूर करीत असल्याचा ठपका ठेवला होता. तसा अहवाल विभागीय आयुक्त राव यांच्याकडे पाठविला होता. चौकशीअंती विभागीय आयुक्त राव यांनी सरपंच सफलता पाटील यांचे सरपंचपद तसेच सदस्यत्व रद्द केले. यात तक्रारदार साळुंखे यांच्यातर्फे ॲड.मंजुनाथ कवकळली तर अपात्र ठरलेल्या सरपंच सफलता पाटील यांच्यातर्फे ॲड. शरद पाटील यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *