धक्कादायक !!!!    “आता जगणं असहाय झालय”अस लिहुन नवर्याच्या व शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळुन पोलिस आयुक्तालयामध्ये जाळुन घेत केले आत्मदहन

धक्कादायक !!!! “आता जगणं असहाय झालय”अस लिहुन नवर्याच्या व शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळुन पोलिस आयुक्तालयामध्ये जाळुन घेत केले आत्मदहन

औरंगाबाद

नवऱ्याच्या आणि शेजाऱ्यांच्या त्रासाला कटाळून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयामध्ये स्वतःला जाळून घेतलेल्या महिलेचा आज शुक्रवारी अखेर मृत्यू झाला आहे. आता जगणं असहाय्य झालंय, अशी चिठ्ठी लिहून सविता काळे या महिलेने गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात पेटवून घेतलं होतं.६० टक्के भाजलेल्या सविता यांच्यावरती घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.

मात्र, १४ तासांनंतर त्याची मृत्यूशी झुंज थांबली आणि आज शुक्रवारी पहाटे ४ वाजता त मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सविता यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

नातेवाईकांच्या मागणीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची संमती दर्शवली आहे. शेजारची महिला त्रास देते, तिचं ऐकून पती मारहाण करतो, याची तक्रार संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, वाळूज पोलिस योग्य दखल घेत नाहीत. जीवनात असहाय्य त्रास होतोय, असे म्हणत सविताने पोलिस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवरती अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतलं होतं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता यांचा २००२ मध्ये दीपक काळे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना २ मुली व एक मुलगा आहे. दीपक हा खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करतो. या दोघा पती-पत्नीमध्ये मागील दहा वर्षांपासून सतत वाद होत होते.

पती दीपक सतत सविता यांना मारहाण करायचा.तसंच,ज्या महिलेवर संशय आहे,तिच्यासह तिचा पती, मुलगा हे देखील सविता यांना त्रास द्यायचे. शेजारचे लोक या ना त्या कारणावरून सविता यांच्याशी वाद घालत शिविगाळ आणि मारहाण देखील करायचे आणि धक्कादायक बाब म्हणजे सविता यांचा नवरा देखील त्यांना साथ द्यायचा.

या प्रकरणी वाळूज ठाण्यात अनेकदा तक्रारीही दिल्या आहेत.त्यावरून दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तसेच, सविता यांच्या भावाला त्या महिलेने चाकू मारला होता, याबाबतही वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

२४ ऑगस्ट रोजीही सविता यांना शेजाऱ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्यावरून वाळूज ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.सविता काळे यांच्यासह त्यांच्या भावाने वाळूज ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारींकडे वाळूज पोलिसांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले, असा आरोप सविता यांच्या नातेवाइकांनी केला आहे. आतापर्यंत दाखल केलेल्या तक्रारींवरून ठोस अशी कारवाई न केल्यामुळे आरोपींचे मनोबल वाढले. त्यामुळे ते सतत त्रास देतात, असा सविताच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *