दुर्दैवी!        कामावरून परतताना मधमाशांचा बाप लेकावर हल्ला; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू

दुर्दैवी! कामावरून परतताना मधमाशांचा बाप लेकावर हल्ला; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू

पुणे

कामावरुन घरी परतणाऱ्या बाप लेकावर मधमाश्यांनी जोरदार हल्ला चढवल्याचा घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये पित्याचा मृत्यू झाला असून जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सैय्यद सबदर इस्माईल (वय ५८ वर्ष) असे मयत वडिलांचे नाव आहे. मुलगा आबिद सैय्यद सबदर हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शिंदोली येथे ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सैय्यद सबदर इस्माईल व त्यांचा मुलगा अबीद सैय्यद इस्माईल हे दोघे कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी चार वाजता घराकडे परतत असताना शिंदोळ गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या झाडावर बसलेल्या मधमाश्या अचानक उठल्या. आणि चवताळलेल्या माशांनी दोघांवर जोरदार हल्ला चढवला.

अचानक झालेल्या या हल्ल्याने दोघेही घाबरुन गेले. यावेळी मधमाश्यांनी तोंडावर, डोक्यात आणि हात पायांवर जोरदार डंख मारले. या हल्ल्यात सैयद सबदर सैयद इस्माईल यांचा जागीच मृत्यू झाला.

तर मुलगा गंभीर जखमी झाला.या  घटनेची माहिती मिळाल्याने परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. व जखमी आबीद याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावर उपचार सुरू आहेत. मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांना जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *