ज्या ठिकाणी भल्या -भल्यांना पोहोचण्याचे असतात वांदे;तिथे सहजच पोहोचुन विकासकामे मंजुर करुन आणतात संभाजी झेंडे

ज्या ठिकाणी भल्या -भल्यांना पोहोचण्याचे असतात वांदे;तिथे सहजच पोहोचुन विकासकामे मंजुर करुन आणतात संभाजी झेंडे

पुरंदर

मा.सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या प्रयत्नातून आंबळे ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आहे.

पुरंदर तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या आंबळे गावातील डोंगरावर वसलेले प्राचीन शिवकालीन ढवळेश्र्वर मंदिर, गावचे ते श्रध्दास्थान आहे,तालुक्यातील व जिल्ह्यातून असंख्य भाविक या ठिकाणीं दर्शनाला येत असतात,मात्र हे मंदिर रस्त्या अभावी विकासापासून वंचित होते.

या मंदिराकडे जाणारा रस्ता हा वनविभागाच्या ताब्यात होता, वर्षानुवर्ष ग्रामस्थांची मागणी होती की हा रस्ता ग्रामपंचायतकडे वर्ग करावा म्हणजे विकासाला वेग येईल मात्र त्याला यश मिळत नव्हते.

नुकतेच पाच महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदिप जगताप , राजेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार राजेंद्र शिंदे यांनी ही बाब माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या निदर्शनास आणून दिली, आंबळे गावचे माजी उपसरपंच सचिन दरेकर,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजित जगताप,दिलीप जगताप, माजी सरपंच मंगेश गायकवाड,सुमित जगताप,संदीप काळे,संदीप चव्हाण, मधुकर ढोले, नंदकुमार जगताप,प्रवीण जगताप, नामदेव थोरात , नितीन ढोले ग्रामपंचायत आंबळे यांनी संभाजी झेंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

आपल्या प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असलेले राज्यात पुरंदरचे भूषण म्हणून ओळखले जाणारे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी याकामी विशेष लक्ष देऊन हा महत्वपूर्ण रस्ता वनविभागाकडून ग्रामपंचायतीकडे वर्ग करून देण्यास सर्वोतपरी मदत केले नुकतीच या आदेशाची प्रत आंबळे ग्रामस्थांना मिळाली.


यानंतर सर्वांनी ढवळेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्याचा निश्चय केला असून आंबळे, राजेवाडी, वाघापूर, टेकवडी, माळशिरस पंचक्रोशीतील नागरिकांनी माजी संभाजी झेंडे साहेब यांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *