जुन्नर अपहार प्रकरणी माजीसरपंच जयश्री मेहेत्रे व ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांना न्यायालयीन कोठडी,येरवडाकारागृहात रवानगी

जुन्नर अपहार प्रकरणी माजीसरपंच जयश्री मेहेत्रे व ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांना न्यायालयीन कोठडी,येरवडाकारागृहात रवानगी

भ्रष्टाचारात अनेकांचे हात गुंतल्याचा संशय!

जुन्नर 

 ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे आणिग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेनभाऊ खराडे यांना देण्यात आलेली पोलिस कस्टडीची मुदत शुक्रवारी संपुष्टात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, जुन्नर न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आरोपींचीरवानगी येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये ३ ऑगस्ट २०२१ रोजी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून तत्कालीनसरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे (रा.नारायणवाडी ,नारायणगाव) व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेनभाऊ खराडे (रा.मंगरूळता.जुन्नर) यांना अटक करण्यात आली होती. या अपहार प्रकरणातील आणखी एक आरोपी महिला सरपंच ज्योति प्रवीणदिवटे यांची जामिन मिळवण्यासाठी धावाधाव सुरू आहे. तर यात अनेक जण सहभागी असल्याची शक्यता वर्तविण्यातयेत आहे.

१ एप्रिल २०१५ ते १८  डिसेंबर २०१५ दरम्यान नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री मेहेत्रे व ज्योति दिवटे याअनुक्रमे सरपंचपदी होत्या. तर याच कालावधीत ग्रामविकासअधिकारी राजेंद्र खराडे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. याकालावधीत ग्रामपंचायतीत रोखीने व्यवहार करणे, ई-टेडरिंग न करता खरेदी करणे आदी बेकायदेशीर व्यवहार करूनशासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे ग्रामपंचायततपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किसन बबन मोरे यांनी नारायणगावपोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या अपहार प्रकरणात अनेकजण अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीवरमाजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यांची सत्ता होती. सत्तेचा रिमोटकंट्रोल त्यांच्याच हाती होता. आणखीकिती प्यादे यात गुंतले आहेत. हे आता तापसंतीच स्पष्ट होईल !मात्र यात आणखी हात असण्याची शक्यता वर्तवली जातआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *