पुरंदर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व नामदेव गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालय या दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांना चारशे रायटींग पॅड चे वाटप पुणे जि. प. तथा नियोजन समितीचे सदस्य दत्ताशेठ झुरंगे यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यमान सरपंच मोहिनीताई खेडेकर,कार्यक्षम उपसरपंच मधुकाका खेडेकर,माध्यमिक शाळा कमिटीचे अध्यक्ष मा.सरपंच रामगुरुजी खेडेकर,मा.सरपंच हिरामणकाका खेडेकर,मा.उपसरपंच आनंदराव खेडेकर मा.तंटामुक्ती अध्यक्ष किसनबापू खेडेकर,सामाजिक कार्यकर्ते पप्पाशेठ जगताप,तंटामुक्ती उपाध्यक्ष विशाल खेडेकर,शिवशक्ती ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष काका खेडेकर,सनीशेठ खेडेकर,प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सिद्धनाथ खेडेकर,सदस्य व मा.शिक्षण विस्तराधिकारी अरुण महाडिक,पालक संघाचे अध्यक्ष विकास शिंगाडे माध्यमिक शाळा मुख्याध्यापक श्री क्षीरसागर,गरुड योगिनी खेडेकर व शिक्षकवृंद उपस्थित होते.
श्री दत्ताशेठ झुरंगे यांच्या माध्यमातून यावर्षी 35 हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यापूर्वीही समाजातील अनेक गरजू लोकांना,मंडळांना,अंगणवाडी,शाळांना मदत केली आहे.दानशूर दत्ताशेठ झुरंगे यांचा सत्कार ग्रामपंचायत गुरोळी यांच्यावतीने करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश लवांडे यांनी तर सूत्रसंचलन सचिन घोलप यांनी व आभार आदर्श शिक्षिका सुवर्णा जगताप यांनी मानले.