पुरंदर
पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी जवळार्जुन येथील युवकांनी घरोघरी जाऊन कडधान्य स्वरूपात मदत गोळा केली.याउपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.ज्वारी,बाजरी,गहू तांदूळ अशा कडधान्यांची जवळपास दहा पोटी जमाझाली.तसेच इतरही जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळाली.
या उपक्रमासाठी सुजित राणे, नागेश टेकवडे, दादा टेकवडे, सौरभ टेकवडे, पंकज टेकवडे, मयूर टेकवडे, दिनेश टेकवडे, चेतन टेकवडे, काका राणे व इतर सहकाऱ्यांनी घरोघरी जावून मदत गोळा करण्यासाठी परिश्रम घेतले.