निरा
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याचा खून करणाऱ्या गौरव लकडे याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय काल रात्री उसाच्या शेतातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आज त्याला.सासावड न्यायालय समोर हजार केले असता त्याला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
जेजुरी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक 16.7 21 रोजी रोजी सायंकाळी निरा येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याचा खून त्याचाच साथीदार असणारा गौरव लकडे याने त्याचा साथीदार निखिल डावरे सोबत, गणेश रासकर यांच्या डोक्यात व जबड्यावर अत्यंत जवळून गोळीबार करून केलेला होता. हा गुन्हा घडल्यानंतर छत्तीस तासाच्या आत मधेच निखिल डावरे तसेच कटामध्ये सामील असणारा गणेश जाधव व आरोपीला अग्निशस्त्र व काडतूस विकणारा कदम यांना पोलिसांनी अटक केली होती.
परंतु पोलिसांना गुंगारा देत यातील मुख्य आरोपी गौरव लकडे अद्याप पर्यंत पोलिसांना मिळाला नव्हता त्यामूळे त्याला पकडण्या साठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती परंतु तो पोलिसांना मिळत नव्हता त्याचा पोलिसांनी सातारा सांगली पंढरपूरया ठिकाणी शोध घेतला होता परंतु तो हा गुन्हा केल्यापासून लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील त्याच्या मिरेवाडी गावातील शिवारात उसामध्ये लपून बसला होता. रात्री दहा वाजता उसाच्या शेतातून पोलिसांनी अटक केलीय…
हि कमागिरी
जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक खांडे यांना गोपनीय माहिती मिळाली की हा आरोपी उसाच्या शेतामध्ये आहे त्यावेळेस रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव कुतवळ पोलीस हवालदार विठ्ठल कदम पोलीस नाईक धर्मवीर खांडे पोलीस हवालदार संदीप कारंडे संदीप मोकाशी तसेच नीरा पोलीस चौकी याठिकाणी असणारे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, सोनवलकर, सुरेश भापकर, सुदर्शन होळकर निलेश जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड पोलीस शिपाई प्रवीण शेंडे चालक पोलीस शिपाई भानुदास सरक, संजय धमाळ यांनी त्या ठिकाणी उसात चोहो बाजूने घेराव करून आरोपी गौरव जगन्नाथ लकडे याला ताब्यात घेतले. आरोपीला अटक करून माननीय न्यायाधीश पाटील मॅडम यांच्यासमोर हजर केले असता त्याला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल व मॅक्झिन त्याच्या शेतातील जुन्या घरात लपवून ठेवले होते ते पोलिसांना काढून दिले आहेत सदरचे हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे . आरोपी कडे पोलीस कसून चौकशी करत आहेत यामध्ये आणखी कुणाची यामध्ये सहभाग आहे का याची चाचपणी करत आहेत सदर आरोपी च्या मदतीने अग्निशस्त्र सप्लाय करणारे मुख्य आरोपी पर्यंत पोलिस पोहोचणार आहेत आरोपीला जेरबंद करण्याची ही कामगिरी पुणे ग्रामीण अधीक्षक माननीय डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.