खायचे दात व दाखवायचे दात वेगळे !!!!                    पुरंदर तालुक़ा शिक्षक पतसंस्थेच्या पदाधिकार्याकडुन शिक्षकालाच मिळाली अशी वागणुक

खायचे दात व दाखवायचे दात वेगळे !!!! पुरंदर तालुक़ा शिक्षक पतसंस्थेच्या पदाधिकार्याकडुन शिक्षकालाच मिळाली अशी वागणुक

पुरंदर

नुकतीच पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची निवडणूक नाटमय घडामोडीत पारपडली. अगदी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकी प्रमाणे साम, दाम, दंड, भेद या नितींसह, जाती, पाती व नाती, गोती, वापरुन निवडणुक रंगतदार झाली. गेली तीन महिने गावभेट दौऱ्यात जेवणावळी झाल्या.

निवडणुक जाहीर होण्याआधीच उमेदवारी व पँनल जाहिर करुन मतदारांची … केली. निवडणूकी नंतर ही नाट्यमय घडामोडी घडतच आहेत. खायचे दात व दाखवायचे दात वेगळे. याचा अनुभव प्रत्यक्ष शिक्षक व सहकऱ्याला रविवारी आला.

रविवारी सासवड येथे एका शिक्षक सहकार्याला निवडून आलेल्या व पदाधिकारी झालेल्या शिक्षकांनी भर कार्यक्रम संपल्यावर चला चहा प्यायला अशी हाक मारली. निवडणुकीनंतर पहिलीच भेट असल्यामुळे चहा पिण्यास सहकार्याने होकार दिला. नियमित ठिकाणी शिक्षक सहकारी पोहचला मात्र दोन आठवडे पदाधिकारी झालेल्या शिक्षक चहाच्या हॉटेल परिसरात फिरकलेच नाही.

त्यामुळे शिक्षक सहकार्याने नुतन पदाधिकाऱ्यांना मोबाईल वर संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर पदाधिकाऱ्यांचा फोन चक्क स्विच ऑफ झाला होता. पदाधिकाऱ्यांच्या विषयी असणाऱ्या स्वच्छ प्रतिमेला अशा वागणुकीमुळे तडा गेला. पदाधिकाऱ्यांनी आपल्या बाबत असं का केलं असेल असा प्रश्न पडला.

शिक्षक सहकार्या सोबत असणाऱ्या व्यक्ती त्यांना म्हणाली या पदाधिकारी महाशयांनी त्यांच्या बाबतीत देखील असेच केले आहे. तेव्हा संबंधित पदाधिकारी महाशयांनी पुन्हा अशी चुक दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीबाबत करू नये असा थेट मेसेजच शिक्षक व्हॉट्सऍप ग्रुपवरच सकाळी सकाळी टाकल्याने दिवसभर चांगलीच कुजबुज झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *